राज्यातील युवक युवतींना आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
योजनेमध्ये पात्र उद्योग/ व्यवसायाकरिता प्रकल्प किंमत कमाल मर्यादा, सेवा उद्योग तसेच कृषी पूरक उद्योग/ व्यवसायासाठी रुपये20.00 लाख व उत्पादन प्रकाराच्या प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रुपये 50.00 लाख राहील.
प्रकल्पामध्ये भांडवली खर्चाचा समावेश असणे आवश्यक आहे
जमिनीची किंमत प्रकल्पामध्ये समाविष्ट करू नये
तयार बांधलेली शेडजी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर आहे अशा शेडचा समावेश होऊ शकतो मात्र प्रकल्पांमधील त्याचे तीन वर्षापर्यंतचे भाडे गृहीत धरले जाईल
सीएमईजीपी अंतर्गत व्यवहार सर्व लघुउद्योगांना लागू आहे
खाद्य उत्पादनांच्या अंतर्भाव या योजनेमध्ये होतो प्रक्रिये सहसेवा सुविधा देणारे आउटलेट्सचा अंतर्भाव होऊ शकतो
पर्यटनाकरिता वाहतूक उपक्रमा अंतर्गत व्हॅन मोटर बोट वाहतूक बोट इत्यादीसाठी या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करता येईल सात एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीसाठी सदर योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो
To know more for the product visit the nearest branch