Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME)

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME)योजना

  • सध्या कार्यात असलेले वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता बचत गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पत मर्यादा वाढविणे
  • उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे
  • सध्या कार्यरत असलेल्या दोन लाख उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे
  • सामायिक सेवा जसे की सामायिक प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळा साठवून पॅकेजिंग विपणन तसेच उद्योग वाढीसाठी च्या सर्वांकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे
  • अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे
  • सदरची मूळ योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर होती मात्र यामध्ये बदल करण्यात आलेला असून अन्य प्रक्रिया होणाऱ्या शेती उत्पादनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे
  • सदर योजना क्लस्टर आधारित व प्रामुख्याने नाशिवंत मालावर राबविली जाईल
  • सदर योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षणावर भर दिला जाणार असून त्याकरिता एकूण खर्चाच्या 100% अनुदान देण्यात येईल
  • या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत
  • योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती महिला यांना प्राधान्य देण्यात आले आहे
  • वैयक्तिक सूक्ष्म उद्योगाला उपक्रमांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 % जास्तीत जास्त 10.00 लाख पर्यंत अनुदानाचा लाभ घेता येईल
  • लाभार्थी गुंतवणूक किमान 10% आवश्यक असून उर्वरित रक्कम बँक कर्ज म्हणून घेण्यास उभा राहीलिली जाईल
  • नोंदणी क्षेत्रीय सुधारणा, हँड होल्डिंग सपोर्ट, प्रकल्प आराखडा (DPR) तयार करणे कौशल्य प्रशिक्षण बँक कर्ज तांत्रिक सुधारणा उद्योग आधार किंवा इतर परवाने काढण्याकरिता योजनेअंतर्गत मदत करण्यात येईल.
  • या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत
  • योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती महिला यांना प्राधान्य देण्यात आले आहे
  • सदर योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ/संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट/ सहकारी उत्पादक यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, इत्यादी करिता प्रकल्प खर्चाच्या 35% आणि ब्रांडींग व बाजारपेठ सुविधाही करता प्रकल्प खर्चाच्या 50 % अनुदान निधी राहील तसेच प्रशिक्षण सुविधा खर्चाच्या 100% अनुदानानुसार उपलब्ध करून देण्यात येईल
  • स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल व छोट्या अवजारांची खरेदी करिता अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित कमाल 10 सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक/ भांडवल (seed capital) म्हणून फेडरेशन मार्फत कमाल रुपये 40 हजार प्रति सदस्य अनुज्ञेय राहील
  • शेतकरी उत्पादक गट/ संस्था, स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक यांना मार्केटिंग व ब्रँडिंग या घटका अंतर्गत अनुदान देय आहे या घटकाअंतर्गत एकूण खर्चाच्या 50% अनुदान अनुज्ञेय राहील तसेच प्रशिक्षण सुविधा खर्चाच्या 100% अनुदानानुसार उपलब्ध करून देण्यात येईल
  • ज्या प्रकल्पांना सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी FME पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  • जिल्हास्तरावर नेमण्यात आलेले RESOURCE PERSON (RP) हे अर्ज सादर केलेल्या उद्योजकांना प्रकल्प आराखडा तयार करणे बँक कर्ज उपलब्ध होण्याकरिता मदत, परवाने, नोंदणी करणे मदत करतील
  • शेतकरी उत्पादक संस्था/ बचत गट/ सहकारी संस्था यांचे सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ब्रॅण्डिंग व बाजारपेठ सुविधे करिता सादर करावयाचे अर्ज प्रकल्प आराखड्यास DPR जिल्हा समितीच्या शिफारसीसह राज्य NODAL AGENCY (SNA) कडे सादर करतील राज्य नोडल एजन्सी सदर प्रकल्पाचे अनुदाना करिता मूल्यमापन करून राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरीत समितीकडे (SLAC) सादर करतील. SLAC ची मान्यता प्राप्त झाल्यानंतर SNA संबंधित बँकेत कर्ज देण्याकरिता शिफारस करेल.
  • बँकेने कर्जाच्या रकमेचा पहिला हप्ता अर्जदारास पूर्ण कर्ज रक्कम वितरण केल्यावर अनुदानावर दावा करेल
  • केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाचा हिस्सा नूडल बँकेमध्ये सध्याच्या युनियन बँकेमध्ये वितरित केला जाईल सदर नोडल बँक अनुदान वर्ग करेल
  • एकदा अनुदान रक्कम बँक स्तरावर लेंडिंग बँक प्राप्त झाल्यावर बँकेला सदरचे अनुदान रक्कम सबसिडी रिझर्व फंड खात्यात ठेवावे लागेल तसेच अनुदान निधी जमा केल्याची तारीख व निधीची पोस्ट पावती तारीख पोर्टलवर अद्यावत करावी लागेल
  • कर्जाच्या अंतिम वितरणापासून तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत लाभार्थी खाते प्रमाणित स्टॅंडर्ड असेल तर सदर प्रकल्प कार्यरत असेल तर उपरोक्त अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात समायोजित केली जाईल.

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch