Personal Loan

बँकेने दि.01/11/2013 पासुन व्यक्तीगत कर्ज योजना सुरु केली आहे. कमाल रु.50,000/- मर्यादेपर्यंत मध्यम मुदत बिगरशेती कर्ज वितरीत केले जाते. नियमित परतफेड करणाऱ्या ग्राहकांना रु.1,00,000/- पर्यंत कर्ज देणेची सुविधा दिलेली आहे. कर्ज मंजुरीचे अधिकार शाखापातळीवर दिलेले आहेत.

  • रु.50,000/- पर्यंत कर्ज देताना पात्रता व मर्यादा
    • लहान व्यावसायीक, अल्प बचत ठेवीदार, बागायतदार, विक्रेते, नोकरदार, कमिशन एजंट इत्यादी.
    • ज्यांचे दरमहा निश्‍चित उत्पन्न असले पाहिजे. उदा.व्यवसाय, नोकरी, गृहउद्योग इ. असे उत्पन्न कर्ज घेताना व पुढील 5 वर्ष नियमित राहिल असे ग्राहक.
    • कर्ज परतफेडीसाठी येणारा हप्ता दरमहा भरणा करणेची क्षमता पाहिजे.
    • मागील किमान 3 महिने आपल्या बँकेत पिग्मी ठेव जमा होत असली पाहिजे किंवा किमान 6 महिने पूर्वी सेव्हींग खाते उघडलेले आवश्‍यक आहे.
    • पूर्वी घेतलेले व्यक्तीगत कर्ज कालावधीची 25% मुदत संपल्यानंतर नविन कर्ज मंजुरी देता येईल.
  • रु.50,001/- ते रु.1,00,000/- पर्यंत कर्ज देताना पात्रता व मर्यादा
    • वरील 1 ते 5 ची पात्रता धारण करणारे ग्राहक व पुढील 2 ते 6 मधील कोणत्या मुद्याची पूर्तता करतील असे ग्राहक.
    • पूर्वी रु.50,000/- पर्यंत व्यक्तीगत कर्ज किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे वैय.थेट कर्ज घेवून मुदतीत पूर्णफेड केलेले ग्राहक किंवा पूर्वी घेतलेले व्यक्तीगत कर्ज कालावधीची 25% मुदत संपल्यानंतर आणि कर्जखाती नियमित आहेत असे ग्राहक किंवा
    • रु.25,000/- किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या बोजाविरहीत मुदत ठेवी बँकेकडे आहेत असे निश्‍चित उत्पन्न धारक ग्राहक किंवा
    • ज्यांचे कुटुंबातील सदस्यांच्या / अन्य व्यक्तीच्या बोजाविरहीत रु.25,000/- पेक्षा अधिक रक्कमेच्या मुदत ठेवी बँकेकडे असल्यास व लिनमार्क करुन मिळत असल्यास त्यांना जामिनदार म्हणुन घेवून किंवा
    • अल्प बचत किंवा अन्य प्रकारच्या दैनिक ठेवीतुन कर्जहप्ता कायम स्वरुपी वसुल होण्याची खात्री असणारे ग्राहक किंवा
    • बँकेकडुन कर्ज घेताना कर्जबाकी नियमित असणारे, ज्यांचे क्षेत्रावर/वाहनावर/इमारतीवर कर्ज बोजा नोंद आहे अशा तारण मालमत्तेची किंमत सर्व प्रकारच्या एकुण शिल्लक कर्ज रक्कमेपेक्षा जास्त असल्यास
  • व्याजदर - 13%
  • जास्तीत जास्त 5 वर्ष (60 महिने) (EMI)
  • विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज.
  • कर्जदाराचे आधारकार्ड असावे व ते बँक खात्याशी लिंक करुन घेण्यात यावे. आधारकार्ड नसल्यास पॅनकार्ड आवश्‍यक राहिल.
  • दोन सक्षम जामीनदार घेण्यात यावेत, सक्षम म्हणजे आपल्या बँकेत व्यवहार असलेले व त्यांची कर्जपरतफेड क्षमता आहे असे ग्राहक
  • कर्जदार व जामीनदार यांचे फोटो, आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड झेरॉक्स
  • उत्पन्नाचा पुरावा

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch