Sindhu Gharkul

बँकेच्या नाममात्र सभासदांना वैयक्तिक थेट व संस्थेमार्फत सभासदांना या योजनेअंतर्गत घर बांधणी, घरखरेदी, घरदुरूस्ती व जमिनीसह घर खरेदी/बांधणीसाठी तसेच बांधलेल्या किंवा बांधावयाच्या इमारतीमधील सदनिका (प्लॅट) खरेदीस थेट मध्यम / दिर्घ मुदती कर्जपुरवठा करणे.

  • बँकेच्या नाममात्र सभासदांना वैयक्तिक थेट व संस्थेमार्फत सभासदांना या योजनेअंतर्गत घर बांधणी, घरखरेदी, घरदुरूस्ती व जमिनीसह घर खरेदी/बांधणीसाठी तसेच बांधलेल्या किंवा बांधावयाच्या इमारतीमधील सदनिका (प्लॅट) खरेदीस थेट मध्यम / दिर्घ मुदती कर्जपुरवठा करणे.
  • या नियमाचे प्रयोजनासाठी घराच्या बांधकामाच्या प्रकारानुसार प्रति चौरस फुट खर्च मर्यादा (Unit Cost) त्या त्या विभागातील शासकीय दरांचा विचार करून, खालील नमूद केल्याप्रमाणे राहील.
अ.नं . घर बांधकामाचा पकार सुधारीत प्रति चौ. फुट खर्च मर्यादा
1 संपूर्ण आर. सी. सी. बांधकाम ग्रामीण भाग रू.1800/-
2 लोड बिअरींग बांधकाम व आर. सी. सी. स्लॅब रू.1500/-
3 लोड बिअरींग बांधकाम व पत्र्याचे/कौलाचे छप्पर रू.1000/-
4 अ. स्वतः बांधकाम करीत असल्यास
ब. सदनिका खरेदी
रू.2200/-
रू.3000/-

  • 01) अ) नवीन घर बांधणी / सदनिका खरेदी -
    एका घराच्या बांधकामासाठी बांधकाम प्रकारानुसार वर नमुद केलेल्या प्रति चौरस फुट मर्यादेनुसार जास्तीत जास्त रू. 25.00 लाखापर्यंत कर्ज मर्यादा राहील. मात्र बांधकामासाठी येणारा खर्च व कर्ज परतफेड क्षमता, लिंकिंग रिकव्हरीची खात्री असल्यास मा. संचालक मंडळ रू. 5.00 लाख पर्यंत वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करू शकेल.
  • ब) घर दुरूस्ती -
    अंदाजपत्रकीय खर्चाच्या जास्तीत जास्त 80% किंवा खालील कमाल मर्यादेएवढे कर्ज मंजूर करता येईल.
    • 01. चिरेबंदी कौलारू घरासाठी रू. 2.00 लाख
    • 02. आर.सी.सी. बांधकाम चिरेबंदी घर व सदनिका दुरूस्ती रू. 3.00 लाख
    • 03. चिरेबंदी लोडबेअरींग घरदुरूस्ती रू. 3.00 लाख
  • ड) जुने घर / जुनी सदनिका खरेदी -

  • अ.क्र. तपशील सुधारणा
    1 घर / सदनिकेचे बांधकाम 5 वर्षाच्या आतील असल्यास ॲग्रीमेंट कॉस्ट किंवा शासन मूल्यांकन यांच्या 80% यापैकी कमी असणारी रक्कम
    2 घर / सदनिकेचे बांधकाम 5 वर्षा वरील मात्र जास्तीत जास्त 12 वर्षा पर्यंत असल्यास घर / सदनिकेचे बांधकाम 5 वर्षा वरील मात्र जास्तीत जास्त 15 वर्षा पर्यंत असल्यास - ॲग्रीमेंट कॉस्ट किंवा शासन मूल्यांकन यांच्या 70% यापैकी कमी असणारी रक्कम
    3 कर्ज मर्यादा जास्तीत जास्त रू. 10 लाख पर्यंत राहील. कर्ज मर्यादा जास्तीत जास्त रू. 15 लाख पर्यंत राहील.
    4 कर्ज परतफेड कालावधी विचारात घेवून जास्तीत जास्त 10 वर्षे (120 हप्ते) मुदत राहील. कर्ज परतफेड कालावधी विचारात घेवून जास्तीत जास्त 15 वर्षे (184 हप्ते) मुदत राहील.
  • कर्जमागणी अर्ज (दोन सक्षम व पात्र जामीनदारांच्या संम्मतीदर्शक सहयासह)
  • घर बांधकाम होणार असलेल्या भुखंडाचा 7/12 उतारा.
  • ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना.
  • इमारतीच्या बांधकामाबाबत आर्किटेक्ट/सिव्हील इंजिनिअर यांचे सहीचा आराखडा व अंदाजपत्रक.
  • कार्यक्षेत्रातील इतर बँका, नागरी पतसंस्था, वि.का.स. संस्था यांचा कर्ज थकबाकी नसलेचा दाखला.
  • अर्जदार, सभासद नोकरदार असल्यास त्याच्या पगारातून कर्जहप्ता कपात करून घेणेबाबत संबंधीत कार्यालयाच्या पगार आदा करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याचे संमत्तीपत्र/दाखला
  • कर्ज परतफेड क्षमता आजमावण्यासाठी नोकरदारांचे बाबतीत वेतन दाखला व व्यावसाईक कर्ज मागणीदाराचे बाबतीत, आर्थिक पत्रके/ इन्कम टॅक्स रिटर्न इ. कागदपत्रे. बागायतदाराचे बाबतीत बागायती नोंदीचे 7/12 उतारे, उत्पन्नाचा सविस्तर तपशिल असलेले घोषणा पत्र इ.

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch